esakal | आयजीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

IGM Hospital

आयजीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी खुले

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी - कोरोना महामारीची दुसरी लाट सुरु झाल्यावर एप्रिलपासून येथील आयजीएम रुग्णालयात (IGm Hospital) केवळ कोविडचे (Covid) उपचार (Treatment) सुरू होते. मात्र आता संसर्गाची तिव्रता कमी झाल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने आजपासून नॉनकोविड उपचारही सुरू करण्यास आले आहेत. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर नॉनकोविड तर दुसर्‍या मजल्यावर कोविडचे उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांना आता आयजीएम रुग्णालयात सर्वप्रकारचे उपचार मिळणे सोयीचे होणार आहे. डेंगीच्या साथीत या नॉन कोविड उपचाराचा सर्वसामान्यांना मोठा आधार ठरेल.

इचलकरंजी शहरात फेबु्रवारी महिन्यांपासून कोरोनाची दुसारी लाट सुरू झाली. बघता बघता संसर्ग वाढु लागल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आयजीएम रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. त्यानंतर नॉनकोविड रुग्णांना हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचा आधार होता. अतिवृष्टी, महापुर यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात साथीचे आजार वाढले आहेत. डेंग्यु, मलेरिया, हिवताप यासारख्या आजारांनी नागरीक त्रस्त आहेत.

हेही वाचा: बॅरेलमध्ये बुडून अडीच वर्षाच्या 'शिवानी'चा दुर्दैवी मृत्यू

आता 4 महिन्यांनी कोराना संसर्गही कमी होत आहे. सध्या आयजीएम रुग्णालयात 85 कोरोना बाधीतांवर उपचार सुुरू आहेत. ही संख्या पाहता संसर्ग कमी झाल्याने आयजीएम रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवर उपचाराची मागणी विविध संघटना, लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी आजपासून आयजीएम रुग्णालयात नॉनकोविड उपचारासाठी खुले करण्यात आले आहे. रुग्णालयातील 50 टक्के बेड कोविड व 50 टक्के नॉनकोविडसाठी उपलब्ध झाले आहेत. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर नॉनकोविडसाठी 60 बेड राखीव ठेवले जाणार असून दुसर्‍या मजल्यावर कोरोना बाधीतांची सोय करण्यात आली आहे. यामुळे अपघातग्रस्त तसेच सर्वसामान्यांना या रुग्णालयात उपचार घेणे सोयीचे झाले आहे.

loading image
go to top