गवसेत 12 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; आजरा पोलिसांची धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवसेत 12 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

गवसेत 12 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा : आजरा - आंबोली रस्त्यावर गवसे (ता. आजरा) येथे आजरा पोलिसांनी (aajara police) छापा टाकून गोवा बनावटी (goa brand alcohol) दारुचा साठा पकडला. विदेशी ब्रॅण्डचे दारुचे बॉक्स, आयशर ट्रक, मोबाईल असा १२ लाख ८९ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (crimenews) आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

खय्यूमपठाण अब्बास खान (वय ३१) रा. मालापूरी, जिल्हा बीड व राम देवराव नलवडे (रा. शनी) मंदिरजवळ बीड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अंमलदार अमोल पाटील यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. गोवा बनावटीचे मद्य विनापरवाना व बेकायदेशीररीत्या आजरा - आंबोली मार्गावरून (aamboli ajara road) राज्यात विक्रीस येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली हाोती. पोलिसांनी गवसे परिसरात तुळशी ढाब्यानजीक सापळा रचला होता.

हेही वाचा: संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण लढा यशस्वी होईल

आज शुक्रवार (ता. २१) पहाटे सव्वातीन वाजता आयशर ट्रकला (एमएच १२ एचडी ३४४१ ) पोलिसांनी अडवले. संशय आल्यावर ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकच्या हौदामध्येच तयार करण्यात आलेल्या चोर कप्प्यांमध्ये गोवा बनावटीचा विविध दारू साठा आढळला. याची किंमत ५ लाख ३४ हजार ५२८ रुपये इतकी आहे. कोरोना काळात संचारबंदीचे आदेश (lockdown condition) भंग करून राज्यात विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विक्रीस चालले असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top