esakal | संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण लढा यशस्वी होईल; ग्रामविकास मंत्र्यांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण लढा यशस्वी होईल

मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा 27 मे पासून राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला होता.

संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण लढा यशस्वी होईल

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर: मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati)आक्रमक झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यासह महाविकास आघाडीवर त्यांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांचा आक्रमकपणा स्वाभाविक आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखालीलंच मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी होईल , असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Rural Development Minister Hasan Mushrif)यांनी व्यक्त केला. शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.(Rural-Development-Minister-Hasan-Mushrif-speech-on-Maratha-reservation-kolhapur-news)

ते म्हणाले, खासदार संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर आघाडी सरकार सकारात्मक आहे . त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असेही त्यांनी सांगितले. खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी नाशिक येथील कार्यक्रमा दरम्यान संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा 27 मे पासून राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला होता. याकडे मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता

ते म्हणाले, खासदार संभाजीराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वेळा पत्र पाठवून त्यांनी मराठा आरक्षणावर बैठक घेण्याची विनंती केली होती. परंतु मोदीनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संभाजीराजे यांनी मोदी यांच्यासह आघाडी सरकारवरही संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी व्यक्त केलेली ही नाराजी योग्यच आहे. त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो.

हेही वाचा- ‘गोकुळ’सत्तांतरानंतरचा दणका; २०० वर तरुणांची नोकरी धोक्यात

आघाडी सरकारचा एक घटक म्हणून मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की ,आघाडी सरकार त्यांच्या भूमिके सोबत आहे. ते मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. मराठा आरक्षणाचा लढा त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी होईल ,असा विश्वास मला वाटतो. या लढ्यात आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार ,राजू लाटकर, गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ ,आदिल फरास ,महेंद्र चव्हाण उपस्थित होते.

loading image