Kolhapur News : साडेआकरा लाखांचा मद्यसाठा जप्त, चौघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal alcohol stock found in kolhapur

कागल सीमा तपासणी नाका आणि निरीक्षक हातकणंगले यांच्या पथकाने सापळा लावला.

Kolhapur : साडेआकरा लाखांचा मद्यसाठा जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर - मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११ लाख ५६ हजाराहून अधिक किमंतीच्या मद्यासह दोन वाहनेही जप्त केली. उचगाव (ता. करवीर) येथील महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. रामेश्वर बळीराम हाटवटे, राहूल रणजित जाधव, जीवन केशव प्रधान (तिघे रा. पाचेगाव, ता. गेवराई, बीड) आणि गोपी ऊर्फ गुरूनाथ देवेंद्र चव्हाण (रा. हडपसर, पुणे) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले, की उचगाव येथील राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) येथून दोन वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानुसार कागल सीमा तपासणी नाका आणि निरीक्षक हातकणंगले यांच्या पथकाने सापळा लावला. कागल ते शिरोलीच्या दिशेने मोटार आणि एक टेंपो संशयास्पदरित्या जात असताना पथकाच्या निदर्शनास आले. त्या दोंन्ही वाहनांना थांबवून त्यामध्ये काय आहे याची विचारणा त्यांनी केली.

हेही वाचा: चिमुकली पडली CRPF जवानाच्या पाया, इमोशनल Video व्हायरल

संशयितांनी टेंपोत केमिकल असल्याचे सांगितले. त्यानी दाखवलेली बीले व कागदपत्रांचा पथकाला संशय आला. पथकाने दोन्ही वाहनांची तपासणी केली. मोटारीत मद्याचे दहा बॉक्स आणि कटर मिळून आले. त्या कटरच्या सहायाने टेंपोच्या शटरचे सील कापून तपासणी केली. प्रथमदर्शनी खोक्यामध्ये द्रव्याने भरलेले कॅन दिसून आले. पण त्याच्या पाठीमागे मद्याचे बॉक्स पथकाला मिळून आले. पथकाने ११ लाख ५६ हजार ८०० रूपयांच्या मद्यसाठ्यासह दोन वाहने असा एकूण १७ लाख ९२ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील, संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक कृष्णांत शेलार, बबन पाटील, जानी मुल्ला, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश लाडके, कर्मचारी मुकेश माळगे, अनिल दांगट, संदीप जानकर, सुभाष कोले, संजय जाधव, धिरज पांढरे, सचिन लोंढे, सागर शिंदे, विशाल आळतेकर, साजिद मुल्ला आदींनी केली.

हेही वाचा: सोनिया गांधींनी आपल्याच तिजोरीतून तिस्ता सेटलवाडला दिले पैसे, भाजपचा आरोप

Web Title: Illegal Alcohol Stock Found Of Rupees 11 Thousand Case Registered Against Four People In Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top