Police display seized foreign liquor and tempo during Kolhapur operation.
sakal
कोल्हापूर
Kolhapur Crime : कोल्हापूर–गगनबावडा रोडवर धडक कारवाई; ३.६६ लाखांची विदेशी दारू जप्त
Illegal Liquor Seizure : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विनापरवाना वाहतूक होणारी लाखोंची विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांना जोरदार धक्का दिला आहे.
कळे : विनापरवाना वाहतूक होणारी ३ लाख ६६ हजार ३२५ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी कळे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

