esakal | गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापुरी तरुण पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

गोवा बनावट दारूसह कोल्हापुरी तरुण पोलिसांच्या जाळ्यात

गोवा बनावट दारूसह कोल्हापुरी तरुण पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड (कोल्हापूर) : महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर येथील तरुणाला येथील पोलिसांनी पाठलाग करून गडहिंग्लज हद्दीत पकडले. त्याच्याकडून वाहनासह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतीक अशोक माळी (रा. महात्मा फुले अपार्टमेंट, पाचवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर ) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

संशयित माळी नागणवाडी येथे मोटारीतून ( एम एच ०४ एम एफ २००९ ) मद्याची वाहतूक करत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांना चुकवून गडहिंग्लजच्या दिशेने जावू लागला. अडकूर येथे पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सुसाट वेगाने पुढे गेला. पोलिसांनी पाठलाग करत गडहिंग्लज येथे एचपी पेट्रोल पंपाजवळ त्याला अडवले. त्याच्याकडे महिंद्रा कंपनीची मोटार तसेच मेगडॉनल, काजू फेनी, डीएसपी ब्लॅक, रॉयल स्टॅग, ओल्ड थ्री एक्स रम, इंपिरियल ब्लू, रॉयल चॅलेंज, ब्लेंडर स्प्राईट, थ्री एक्स रेड रम आदी कंपनीचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल वैभव गवळी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक भैरव तळेकर तपास करीत आहेत.