Crime News : ४० हजारांत गर्भपात, २१ हजारांत गर्भलिंग निदान; बेकायदेशीर रॅकेटवर कारवाई

PCPNDT Act : गर्भलिंग निदानासाठी २१ हजार आणि गर्भपातासाठी ४० हजार आकारणाऱ्या रॅकेटचा तपास सुरू; एजंटांच्या जाळ्याचा शोध घेण्याचे काम सुरू.
aboration crime 

aboration crime 

sakal

Updated on

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या गर्भलिंग निदानव गर्भपात केंद्रप्रकरणी ताब्यात घेतलेल्या डॉ. युवराज पाटील (रा. सोनाळी, ता. कागल) व एजंट संभाजी शिंदे (रा. बोरवडे, कागल) याला आज कागल पोलिसांनी अटक केली. डॉ. पाटील गर्भलिंग निदानसाठी २१ हजार रुपये, तर गर्भपात करण्यासाठी ४० हजार रुपये घेत असल्याची माहिती तपासात समोर आली. त्याच्याकडील पोर्टेबल मशीनही जप्त करण्यात आले असून, ते कर्नाटकातून आणल्याची कबुली त्याने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com