न्यायालयाने निर्णय देताना कोरटकरला न्यायालयात हजर राहणे गरजेचे नसल्याचे निरीक्षण नोंदवत पोलिसांची मागणी फेटाळून लावली.
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी पोलिसांची मागणी फेटाळली. त्याच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्याने सोमवारी (ता. १७) याबाबत अंतिम युक्तिवाद होणार आहे.