कोल्हापूर : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑइल विक्री कंपनीच्या देशभरातील सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे इंधन पुरवठा तात्पुरता विस्कळीत झाला आहे. ही केवळ तांत्रिक अडचण असून पेट्रोल किंवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही.