इचलकरंजी : ‘‘आमचे सरकार गप्पा मारणारे सरकार नाही. त्यामुळे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासमोर (Ichalkaranji Textile Industry) असलेल्या प्रश्नावर चर्चा करून ते भविष्यात निश्चितपणे सोडविण्यात येतील,’’ अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी दिली.