
"जिल्ह्यातील सुमारे बारा लाख मते महाविकास आघाडीला मिळाली आहेत. याचा अर्थ जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ताकद कमी झालेली नाही."
कोल्हापूर : राष्ट्रीय काँग्रेसचा विचार संपलेला नसून, कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे (कै.) आमदार पी. एन. पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन सभेत ते बोलत होते. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत (Congress Committee) सभा झाली.