कोल्हापूर : ‘तत्कालीन परिस्थितीत परदेशात जायला कोणी तयार नसताना राजाराम महाराज (दुसरे) ‘स्पिरीट ऑफ इन्क्वायरी’च्या बळावर इंग्लंडला (England) गेले. ब्रिटिश कसे राज्य करतात, याची उत्सुकतेने माहिती घेतली. मात्र, परत येताना राजाराम महाराजांचे (Rajaram Maharaj) निधन झाले. त्यांचे निधन झाले नसते, तर कोल्हापूरचा इतिहास बदलला असता,’ असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केले.