
कोल्हापूर : शहरातील पायाभूत सुविधामध्ये वाढ करायला हवी. रस्ते, सांडपाणी निर्गत व्यवस्था, अतिक्रमणमुक्त फुटपाथ, पाणी वितरण व्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य या सुविधा चांगल्या पध्दतीने करण्याकडे भर द्यायला हवा. ही सर्व कामे शहरस्तरीय असायला हवीत, तरच शहराची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होणार आहे. त्यादुष्टीने महापालिका अंदाजपत्रकात ठोस तरतूद करायला हवी.
कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांवर आता भर द्यायलाच हवा. त्याशिवाय या शहरामध्ये रोजगार निर्मिती होणार नाही. आपल्या शहरात पर्यटकांचा ओघ वाढायला येथे पोषक वातावरण तयार करायला हवे, ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनाला येथे वाव आहे. अंबाबाई दर्शनाच्यानिमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दिवसागणिक या भाविकांमध्ये वाढच होत आहेत. पण पर्यटनाच्यादुष्टीनेही कांही सुविधा येथे निर्माण व्हायला हव्यात, तरच य शहराचा विकास होणार आहे. त्यासाठी महापालिकेने विकासकामांसाठी भरीव तरतूद करायला हवी. त्यामध्ये रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी या सुविधांकडे लक्ष द्यायला हवे.
शहरात 81 प्रभाग आहेत. हे प्रभाग गुणिले सात किंवा दहा लाख, असा निधी वितरीत करुन विकास केला जातो. पण यापेक्षाही प्रत्येक प्रभागाचा डीपीआर तयार करायला हवा आणि प्राधान्यक्रमाने त्या विकासकामांना निधी देणे गरजेचे आहे.
प्रभागातील विकासकमाबरोबर शहरस्तरावरची प्रमुख विकासकामेही करायला हवीत, त्यासाठी महापालिका बजेटमध्ये भरीव तरतूद व्हायला हवी. शहरातील प्रमुख रस्ते, त्यानां जोडणारे सर्व उपरस्ते, शहरातील महत्वाच्या ठिकाणांना,मंदिराला जोडणारे रस्ते,पर्यटनस्थळांना जोडणारे रस्ते असे प्राधान्यक्रम लाउन त्यादुष्टीने रस्त्यांसाठी निधी द्यायला हवा.तरच शहरातील चांगले इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल.
उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग गरजेचे
शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. ही सर्वच कामे महापालिकेच्या निधीतून होणार नाहीत. कोल्हापूर महापालिका तर शासकीय निधीवरच अवलंबून आहे. पण कांही छोटे पूल अथवा भुयारी मार्ग करुन शहरातील वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने डीपीआर तयार करुन टप्याटप्याने या कामावर निधी खर्च केला तर वाहतूक कोंडी फुटणार आहे. विशेषतः परिख पूल जुना,जीर्ण झाला आहे. त्यासाठी पर्यायी भुयारी मार्ग करायला हवा. त्यासाठी निधीची तरतूद करायला हवी. महापालिकेने काम हाती घेतले तर उर्वरित कामासाठी राज्यसरकारकडेही निधी मागता येईल.
विकास आराखड्यातील रस्ते करावेत
शहर विकास आराखड्यातील रस्ते ताब्यात घेउन ते करण्यासाठी महापालिका अंदाजपत्रकात तरतूद करायला हवी. विशेषता खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा हा एक विकास योजनेतील रस्ता प्रलंबीत आहे. टीडीआर देऊन अथव नुकसान भरपाई देऊन विकास योजनेतील हा रस्ता तयार करायला हवा. त्यासाठी महापालिका बजेटमध्ये तरतूद हवी.
शहरातल रस्ते करताना ते सुनियोजीत असावेत. नवे रस्ते केले आणि खोदले असे प्रकार अनेकदा होतात.यामुळे पैशाचा अपव्यय होतो.परदेशात याबाबीकडे कटाक्षाने लक्ष देउन नियोजनबध्द रस्ते केले जातात. शहरातील बागा, खुल्या जागा या प्रदूषविरहीत असाव्यात, या ठिकाणी ज्येष्ट नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा. शहरात चांगल्या दर्जाची स्वछतागृहे असायला हवीत. मोकाट जनावरे,भटकी कुत्री यांचाही बंदोबस्त व्हावा.
- डॉ. विलासराव देशमुख
घरफाळा व पाणीपट्टीची रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी महपलिकेने विशेष प्रयत्न करावा. त्यासाठी जनजागृती करावी. पैसे भरण्यासाठी विशिष्ट दिवसांची सूट दिल्यास नागरिक स्वताहून ऑनलाईन बिले भरतील. यामुळे महापालिकेच्या खजिन्यात नियमित पैसे जमा होतील व त्यातून शहरात कांही चांगल्या योजना राबविणे, शक्य होणार आहे. महापालिकेने नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन स्विकाराव्यात व त्याचे निराकरण तात्काळ करावे.
- रविंद्र रनाळकर, सहाय्यक कक्ष अधिकारी यशवंतराव चव्हाण,मुक्त विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.