esakal | भारत बंदमध्ये सहभागी व्हा : पालकमंत्री पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

भारत बंदमध्ये सहभागी व्हा : पालकमंत्री पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी (ता. २७) संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले आहे.

गेले दहा महिने सुरू असलेले शेतकरी आंदोलन जगात ऐतिहासिक ठरले आहे. दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण सत्याग्रहास २६ सप्टेंबर रोजी दहा महिने पूर्ण होत आहेत. या सत्याग्रहात ६०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. ५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे महापंचायतीची सभा झाली.

त्यात जमलेल्या १० लाख शेतकरी कामगारांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजप सरकारचा येत्या निवडणुकीत पराभव करण्याची त्या राज्यातील जनतेला हाक दिली आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून सोमवारी (ता. २७) भारत बंदचे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा यांच्या वतीने केले आहे. शेतकरी, कामगार, सर्व प्रकारचे व्यावसायिक यांच्यासह जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे श्री. पाटील यांनी आवाहन केले आहे.

व्यापाऱ्यांना सहभागाचे आवाहन

दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी (ता. २७) संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले आहे.

गेले दहा महिने सुरू असलेले शेतकरी आंदोलन जगात ऐतिहासिक ठरले आहे. दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण सत्याग्रहास २६ सप्टेंबर रोजी दहा महिने पूर्ण होत आहेत. या सत्याग्रहात ६०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. ५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे महापंचायतीची सभा झाली. त्यात जमलेल्या १० लाख शेतकरी कामगारांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भाजप सरकारचा येत्या निवडणुकीत पराभव करण्याची त्या राज्यातील जनतेला हाक दिली आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून सोमवारी (ता. २७) भारत बंदचे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा यांच्या वतीने केले आहे. शेतकरी, कामगार, सर्व प्रकारचे व्यावसायिक यांच्यासह जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे श्री. पाटील यांनी आवाहन केले आहे.

loading image
go to top