
इचलकरंजी महापालिका होणार; नगरविकास विभागाची अधिसूचना जारी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक मनपाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे इचलकरंजीचा महापालिका होण्याचा मार्ग गुरुवारी (ता. ५) मोकळा झाला. आता पालिकेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे. याबाबतची घोषणा गुरुवारी नगरविकास विभागाने अधिसूचना जारी करून केली. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील २८ वी महानगरपालिका असणार आहे. या निर्णयामुळे पालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया थांबणार आहे. (Involvement of another corporation in Kolhapur district)
पुढील निवडणूक महापालिका म्हणून होणार आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर पालिका करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार इचलकरंजी पालिकेत पाच खातेप्रमुखांची एक समिती स्थापन केली होती.
हेही वाचा: कर्मचाऱ्यांना वीर्य पिण्यास पाडले भाग; नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक
समितीने पनवेल महापालिकेच्या धर्तीवर सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. आता याबाबतची सूचना जारी झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोणतीही हद्दवाढ न होता महापालिका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने तसा जीआरही काढला आहे. या महापालिकेसाठी जास्तीचा निधी दिला जाणार आहे. इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार मानले.
Web Title: Involvement Of Another Corporation In Kolhapur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..