कोल्हापूर : ‘कोल्हापुरातील आयटी पार्कबाबत (Kolhapur IT Park) पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. त्यात या क्षेत्रातील तज्ज्ञांसमवेत चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल’, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथे केले. येथील लोटस हॉलमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यातील रुग्णसेवकांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते.