
Oppose Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला कोल्हापूरसह सांगली, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांत महामार्ग रोको करण्याची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी दिवस कमी असल्याने गावागावांत जाऊन या आंदोलनाची जनजागृती करावी, असेही यावेळी ठरले. शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी ऑनलाईन बैठकीत हा निर्णय झाला.
सायंकाळी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे संयोजक आमदार सतेज पाटील होते. यामध्ये खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विश्वजित कदम, आमदार कैलास पाटील यांच्यासह १२ जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.