लग्न लागेल, पण बॅन्डबाजा नाही... 

It will take a wedding, but not a band ...
It will take a wedding, but not a band ...
Updated on

कोल्हापूर : विवाहासाठी 50 लोकांना उपस्थित राहण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर मंगल कार्यालयांच्या पॅकेजमध्येही आता बदल झाला आहे. 50 ते 65 हजारांचे पॅकेज असेल तर त्यात हॉल भाडे, आचारी, सजावट, भटजी, भोजनाचा समावेश आहे. बॅन्ड बाजाला मात्र परवानगी मिळालेली नाही. 

लॉकडाऊनमुळे विवाहाचे मुहुर्त वाया गेले आहेत. तीन महिन्यांच्या काळात मंगल कार्यालयांच्या चालकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. विवाहासाठी ऍडव्हान्स तर भरली आहे ती परत मागायची पंचाईत पार्टीसमोर उभी राहिली. विवाहाची तारीख बदलून मिळेल पण पैसे परत मिळणार नाहीत, अशी भुमिका घेतली. आता, मात्र पूर्वी ऍडव्हान्स रक्कम भरली असेल तरी पॅकेजमधून कपात करण्याची मुभा मंगल कार्यालयांनी दिली आहे. विवाहाच्या पॅकेजला 28 हजाराहून सुरवात होते. पन्नास ते 65 हजारात विवाह उरकून देण्याची प्रक्रिया कार्यालय चालक पार पाडतात. 

जे पन्नास लोक उपस्थित राहणार आहेत त्यांची यादी कार्यालयाकडे द्यावी लागेल. ज्यांची नावे यादीत आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश मिळेल. एखाद्याकडे मास्क नसेल तर तो ही जाग्यावर दिला जाईल. प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायजर दिले जाईल. तसेच थर्मल स्क्रीनिग केले जाईल. विवाह मुहुर्तावेळी सोशल डिस्टनिंग राखून खुर्चीमघ्ये अंतर ठेवले जाते. डायनिंग टेबलवरही दोनच लोक एकावेळी जेवतील अशी व्यवस्था आहे. 

भोजनाचा मेनू हा पॅकेजच्या रकमेवर अवंलबून आहे. रक्कम जेवढी वाढत जाईल तसा मेनूही बदलत जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक तसेच घरगुती कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यात विवाहाचा समावेश होता. उन्हाळ्यातील सिझन वाया गेल्याने मंगल कार्यालय मालकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या. महिन्याचा हप्ता, देखभाल दुरूस्ती, कर्मचाऱ्यांचा पगार देणे मुश्‍कील झाले. मूळात विवाहाचा सिझन तीन ते चार महिन्याचा पुढे तुलसी विवाहानंतरच मुहुर्त निघतात त्यामुळे सहा महिने नेमके करायचे ? काय असा प्रश्‍न निर्माण झाला. 

किमान वीज आणि पाणी बिलाचे पैसे बाहेर पडू दे या उद्देशाने पॅकेजची संकल्पना पुढे आली आहे. वधू तसेच वराकडींल लोकांनी नुसती उपस्थिती लावायची अन्य जबाबदारी पॅकेजनुसार कार्यालय चालकांची असेल. अगदी भटजीचा यात समावेश आहे. विवाह समारंभ म्हंटले की बॅन्डबाजा आला मात्र त्यास परवानगी नसल्याने बॅन्डबाजा मात्र पॅकेजमध्ये असणार नाही. 

हॉलच्या आकारानुसार तसेच पार्टीच्या मागणीनुसार पॅकेजचे दर आहेत. 28 हजार, 35 ते 65 हजार असे हे दर आहेत. कोरोनाने उद्योग व्यवसायाची समीकरणे बदलून ठेवली आहे. पूर्वी विवाह थाटामाटात करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. मानपानानचे नाट्य रंगायचे, दुपारचे चार वाजले तरी पंगती उठायच्या, हा ट्रेंड बदलला असून निमंत्रण देतानाही पन्नास पाहुण्यांचीच निवड करावी लागत आहे. वधू आणि वर अशी त्यांची विभागणी झाल्यास दोन्गीकडील मिळून 25 जणांनाच संधी मिळते 

कोरोनामुळे विवाहाची संकल्पना बदलून गेली आहे. मंगल कार्यालय चालकांनी नियम पाळून पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह लावण्यास सुरवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर, थर्मल स्क्रीनिंग अशी व्यवस्था असेल. जे पन्नास लोक येणार त्यांची यादी आमच्याकडे द्यायला हवी. पॅकेजमध्ये बॅन्ड सोडून अन्य बाबींचा समावेश असेल. 
- सागर चव्हाण, अध्यक्ष, मंगल कार्यालय संघ 


दृष्टिक्षेप 
- विवाहाचे पॅकेज 28 हजार ते 65 हजारपर्यंत 
- हॉल भाडे, आचारी, सजावट, भटजी, भोजनाचा समावेश 
- 50 लोकांची यादी द्यावी लागणार 
- मंडपात सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com