esakal | 'गोकुळ'च्या निकालानंतर लगेच जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू

बोलून बातमी शोधा

'गोकुळ'च्या निकालानंतर लगेच जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू
'गोकुळ'च्या निकालानंतर लगेच जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू
sakal_logo
By
लुमांकत नलवडे

कोल्हापूर : जिल्हा दूध संघाची (गोकुळ) (Gokul Election) मतमोजणी सुरू असतानाच उद्या (5) पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे बैठक घेवून घेतला होता. त्याची माहिती ही प्रसिद्धीस दिली. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) टिकेचा भडीमार झाला आणि सायंकाळी पुन्हा जनता कर्फ्यू (संचारबंदी) पाळण्याचे आवाहन करणारे प्रसिद्धी पत्रक कामगार मंत्री हसन मुश्रीफ, (Hasan Mushrif) पालकमंत्री सतेज सतेज पाटील, (Satej Patil) आरोग्यराज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नावाने जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिले आहे. यापूर्वीचे आदेश जिल्हाधिकारी ( Kolhapur Collector)यांच्या मार्फत जाहीर केले जात होते.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यात 14 एप्रिलपासून संचार लागू आहे. त्यामध्ये नागरिकांना (Citizen) योग्य कारण असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध केला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोना (Covid -19) रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांच्या हालचाली योग्य कारणाशिवाय सुरू राहिल्यास रुग्णांमध्ये वाढ होऊन त्याचा जिल्हयातील सर्व नागरिकांना अनावश्‍यक त्रास होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याबाबत प्रतिबंधात्मक आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याबाबत निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना उद्या (5) सकाळी अकरा वाजल्यापासून ते 13 मे सायंकाळी सात पर्यंत जनता कर्फ्यु (संचारबंदी) (Curfew) उत्स्फुर्तपणे पाळण्याचे आवाहन करीत आहोत.

हेही वाचा: 'गोकुळमध्ये सत्तांतर'; महाडीकांच्या गोकुळात पाटील, मुश्रीफ जोडगोळीचा ऐतिहासिक विजय

नागरिकांना केलेले आवाहन असे -

  • नागरिकांनी अत्यावश्‍यक सेवा, तातडीची वैद्यकीय (Meidacal) गरज या शिवाय घराबाहेर पडू नये.

  • वैध कारण असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.

  • वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात.

  • अत्यावश्‍यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी आदी दुकाने सकाळी सात ते अकरा पर्यंत उघडे राहतील.

  • परंतू नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी, अत्यावश्‍यक बाब नसेल तर अत्यावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडू नये.

  • हॉटेल, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.

  • अत्यावश्‍यक निर्यात, व निरंतर प्रक्रीया उद्योग, अस्थापना, यापूर्वी दिलेल्या नियंत्रणास बांधिल राहतील.

  • शेती व शेतीशी निगडीत त्याच प्रमाणे मान्सून पूर्व सर्व कामे सुरू ठेवावीत.