

आष्टा येथील चंद्रप्रभनाथ विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते.
esakal
Jayant Patil Slams Government : ‘‘आधी सहकारी संस्थांना मोठे महत्त्व होते. मात्र आज जाणूनबुजून खासगीकरण वाढवून सहकारी संस्थांचे महत्त्व कमी करण्याचे काम सुरू आहे. सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण विकासाची चळवळ आहे. ही चळवळ संपवण्याचे प्रयत्न काही ठिकाणी होत असून, त्याला तोंड देण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे,’’ असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. आष्टा येथील चंद्रप्रभनाथ विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते. या वेळी सोसायटीच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.