
जयसिंगपूर : मोटारसायकल चोरणाऱ्या सागर मंजुनाथ कौलगे (वय २२, रा. गणेश कॉलनी, पहिली गल्ली, जयसिंगपूर) याला जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्याच्याकडून सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.