

jaysingpur-garbage-footpath-cleanliness-message-civic-failure
sakal
जयसिंगपूर : भिंतीवर स्वच्छतेचे संदेश आणि त्याखालीच कचऱ्याचे ढीग असे चित्र शहरातील महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटजवळ पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या फुटपाथवरच कचऱ्याचे ढीग पडल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे यावरून स्पष्ट दिसते.