या बदल्यांसाठी वशिलेबाजी करण्याची वेळ पोलिसांवर येत असेल तर काही तरी ‘गौडबंगाल’ नक्कीच असावे. येथे बदलीसाठी दहा लाखांची जुळणी करावी लागत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
कोल्हापूर : महामार्ग पोलिस विभागात (Highway Police Department) बदली करण्यासाठी सहा पोलिसांकडून १३ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्र्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून बदल्या करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या संशयित मनोज प्रकाश सबनीस (वय ३२, रा. तारदाळ, हातकणंगले) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याने वर्षभरात पोलिसांकडून रोखीने व ऑनलाईन पैसे घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.