जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये (Udgaon Technical High School) माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात (Get Together) गीत सादर करताना निवृत्त शिक्षक विनायक सखाराम कुंभार (वय ७८, सध्या रा. मगदूम सोसायटी, जयसिंगपूर, मूळगाव वारणा कोडोली, ता. पन्हाळा) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थ्यांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.