
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील पडळी ग्रामपंचायतीपैकी जोंधळेवाडी गाव आजही झऱ्याचे पाणीच पिण्यासाठी वापरत होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी नळाने पाणी येत आहे. सेवावर्धी, भोगावती सांस्कृतिक मंडळाच्या प्रयत्नातून येथे जलदूत प्रकल्प राबवला गेला. त्यातून हे परिवर्तन शक्य झाले.