Jotiba Chaitra Yatra 2026
esakal
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी (ता. १) असला तरी काल कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रेस प्रारंभ झाला. सकाळपासून राज्यभरातून भाविक येण्यास सुरुवात (Jotiba Chaitra Yatra 2026) झाली. काल सकाळी गायमुख तलावमार्गे दक्षिण दरवाजातून बेळगाव सीमाभागातील भाविक आले. बालेघाट, बीड, लातूरसह अन्य राज्यांतील भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली. सात दिवसांची पायपीट करून बैलगाडी घेऊन आलेल्या कर्नाटकातील भाविकांचे डोंगरावर आगमन झाले.