
-निवास मोटे
जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेत अनेक मानाच्या सासनकाठ्या सहभागी होतात, त्यापैकी पहिला मान पाडळी (ता. जि. सातारा) या गावच्या सासनकाठीला आहे. या सासनकाठीला नवीन संपूर्ण रेशीम कापडाच्या पोषाख केला असून, त्याची किंमत तीन लाख रुपये आहे.