esakal | डोंगराला छावणीचे स्वरुप:जोतिबाची तहसीलदारांच्या हस्ते शासकीय महापूजा

बोलून बातमी शोधा

डोंगराला छावणीचे स्वरुप: जोतिबाची तहसीलदारांच्या हस्ते शासकीय महापूजा
डोंगराला छावणीचे स्वरुप: जोतिबाची तहसीलदारांच्या हस्ते शासकीय महापूजा
sakal_logo
By
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाच्या यात्रेचा आज मुख्यदिवस. आज सकाळी पहाटे पाच वाजता पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे उपस्थित होते. या पूजेवेळी केदार स्तोत्र, केदार महिमा यांचे पठण करण्यात आले.

सकाळी आठ वाजता जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत जोतिबा देवाचा पालखी सोहळा होणार आहे. आज बंदोबस्तामुळे डोंगराला छावणीचे स्वरुप आले आहे.डोंगरावर सर्वत्र कडक संचारबंदी आहे.

Edited By- Archana Banage