
कोल्हापूर : श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे मंगळवार (ता. २१) ते शुक्रवार (ता. २४) या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. जोतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे.