शिंदे गटाच्या गुंड प्रवृत्तीच्या जिल्हाध्यक्षाला तातडीनं अटक करा; राजेखान जमादारविरुध्द पत्रकार आक्रमक

गुंड प्रवृत्तीच्या जमादार यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करत पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Kolhapur Press Club
Kolhapur Press Clubesakal
Summary

या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जमादार याच्यावर पक्षांतर्गत कारवाई करून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही प्रेस क्लबने केली.

कोल्हापूर : विरोधात बातमी दिल्याच्या गैरसमजातून दैनिक ‘सकाळ’चे मुरगूड (ता. कागल) येथील बातमीदार प्रकाश तिराळे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्ध आज कोल्हापूर प्रेस क्लबने दसरा चौकात तीव्र निदर्शने केली. शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Group) जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार (Raje Khan Jamadar) याने साथीदारांसह पत्रकार तिराळे यांना अर्वाच्य शिवीगाळ करून फरफटत नेऊन मारहाण केली.

या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जमादार याच्यावर पक्षांतर्गत कारवाई करून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही प्रेस क्लबने केली. दरम्यान, मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतानाही पोलिस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर दहशत आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या जमादार यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करत पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Kolhapur Press Club
Kolhapur Lok Sabha : 'या' 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य, त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल!

‘जमादार यांना अटक करा, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

बिद्री परिसर पत्रकार संघाकडून निषेध

बिद्री : मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्याच्या साथीदारांनी तिराळे यांना केलेल्या मारहाणीचा बिद्री परिसर पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भैरवनाथ डवरी, टी. एम. सरदेसाई यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

कागल तालुका पत्रकार संघटनेकडून कारवाईची मागणी

म्हाकवे : जमादार याने केलेल्या मारहाणीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर कागल तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. जमादार यांच्यासह आसिफखान ऊर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सागर लोहार, एन. एस. पाटील, रमेश पाटील यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Kolhapur Press Club
Murgud Police : बातमी का दिली म्हणत भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; शिंदे गटाच्या राजेखान जमादारवर गुन्हा दाखल

इचलकरंजीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

इचलकरंजी : तिराळे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे इचलकरंजीतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव व प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन दिले.

पन्हाळा-शाहूवाडी पत्रकार संघाकडून निषेध

बोरपाडळे : मारहाणीचा पन्हाळा-शाहूवाडी पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी अध्यक्ष कृष्णात जाधव, शरद जाधव, भीमराव पाटील यांच्यासह उपस्थित होते.

राधानगरीतील पत्रकारांचा आंदोलनाचा इशारा

राशिवडे बुद्रुक : शिवीगाळ आणि मारहाणीचा राधानगरी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध केला. दरम्‍यान, हुपरी येथील पत्रकारांनीही पाेलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

Kolhapur Press Club
Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

कागल शहरातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना ई-मेल

कागल : तिराळे यांना झालेल्या मारहाणीचा कागल शहर पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. निवेदनाची प्रत शहरातील सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई- मेल केली. नरेंद्र बोते, नंदकुमार कांबळे, बा. ल. वंदूरकर, जहाँगीर शेख, प्रा. भास्कर चंदनशिवे, तानाजी पाटील, इम्रान मकानदार, कृष्णात कोरे आदींनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवले. उद्या तालुक्यातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कागल पोलिस स्टेशनला निवेदन देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com