Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

या दर्ग्याची कथा अशी सांगतात की, हैदराबादच्या (Hyderabad) सिंधप्रांतातून हे याकुबबाबा केळशी गावात आले आणि छोटे-मोठे चमत्कार त्यांच्याकडून घडले.
yakub baba dargah
yakub baba dargahesakal

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

त्सुनामी लाट तशी कोकणात आली, देवबागला एक टेकडी करून गेली तीही हल्ली हल्ली काही वर्षात. अशीच एक टेकडी केळशी गावात (Kelshi village) आहे, जी काहीशे वर्षांपूर्वीची त्सुनामी लाटेतून झाली असावी, असा अंदाज आहे. या टेकडीचे वैशिष्ट्य असे की, या टेकडीच्या भागात कधी कधी जुन्या काळातील भांडी वगैरे मिळतात. कदाचित अगोदर तिथे गावाची सीमा असावी किंवा दुसरीकडून प्रचंड प्रवाहात त्या वस्तू आल्या असाव्यात.

yakub baba dargah
Konkan News : दौलतदादाच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि नकळत डोळे पाणावले!

बरेचजण कोकण फिरायला येणारे दापोलीपर्यंत मजल मारतात आणि नंतर उभ्या उभ्या आंजर्ले गावातील कड्यावरचा गणपती पाहून येतात. वास्तविक आंजर्ले सुंदर आहेच; पण तेथून पुढे काही किलोमीटरवर असणारे केळशी गावसुद्धा तितकेच सुंदर आहे. पारंपरिक सुपारीच्या बागा, अतिशय अरूंद रस्ते त्याला जांभ्याची कुंपण असलेली घरे. आपण खेटूनच या गावातून जात असतो. तेथील त्सुनामी टेकडी सहसा पर्यटनयादीत येत नाही. त्यामुळे गावातसुद्धा तसा फार उत्साह नसतो; परंतु गावातील एखाद्याला विचारत विचारत जाता येते. मिळाली एखादी वस्तू तर मिळाली.

हे त्सुनामी बेट पाहून झाले की, थेट निघायचे ते याकुबबाबा दर्गा (Yakub Baba Dargah) पाहायला उटंबर गावात. तेथून एक टेकडी चढली की, आपण या दर्ग्याजवळ पोहोचतो. या दर्ग्याचे संपूर्ण नाव हजरत पीरबाबा याकुब सरवरी दर्गा असे आहे. या दर्ग्याची कथा अशी सांगतात की, हैदराबादच्या (Hyderabad) सिंधप्रांतातून हे याकुबबाबा केळशी गावात आले आणि छोटे-मोठे चमत्कार त्यांच्याकडून घडले. त्यामुळे त्या काळात ते प्रसिद्ध झाले. छत्रपती शिवरायांनी कोकणातील एका मोहिमेच्यावेळी या याकुबबाबांचे मार्गदर्शन घेतले आणि मोहिमेत विजय मिळवला. त्यामुळे केळशी भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा प्रसिद्ध आहेत.

yakub baba dargah
एखादी हटके सहल करायची असेल, फ्लॉवर व्हॅलीमध्ये रमायचं असेल तर 'या' ठिकाणी जरूर भेट द्या..

या मोहिमेनंतर साधारण सहाशे एकर जागा या दर्ग्याकरिता महाराजांनी दान केली, असे बखरीमधून सांगितले जाते तसेच या दर्ग्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांनी सुरू केले आणि राजे संभाजी महाराज यांनी पूर्ण केले, असे दाखले बांधकामाची रचना दाखवून स्थानिक लोक करतात. बाबा याकुब यांच्या काही वस्तू येथे पाहायला मिळतात. अरबी भाषेत असलेले लोखंडी पंजे ही अनोखी वस्तू पाहायला मिळते. येथे दरवाजावर पारसी भाषेत काही सांकेतिक लिहिलेले आहे; पण त्याची फोड अजून करता आलेली नाही. याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला असता कुठेही माहिती मिळाली नाही.

yakub baba dargah
दिनकरसारखी कोकणातली माणसं, मुंगी होऊन साखर खाणारी अन् त्या साखरेचा गोडवा इतरांना वाटणारी!

या बाबांचा वर्षातून एकदा साजरा केला जाणारा स्थापनादिन केळशी प्रांतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. याचा प्रसाद गावातीलच हिंदू लोक करून देतात. प्राचीन बांधकाम असल्याने पाहायला मस्त वाटते. विशेषतः याचा व्हरांडा आणि त्याची फ्रेम यातून फोटो काढले तर आपण समुद्राचे चित्र पेंट करून पाहतो आहे, असे वाटते. या दर्ग्याकडे जाण्याअगोदर केळशीमधील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे, ते पण पाहण्यासारखे आहे; पण मला हा दर्गा आणि हे मंदिर विविध राजवटी ज्या कोकणप्रांतात आल्या आणि त्याचा प्रभाव स्थापत्यशैलीत पडत गेला त्याचे प्रतीक वाटते. आता हे महालक्ष्मी मंदिरदेखील थोडे पारसी मुस्लिम वगैरे बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी बांधल्यासारखे वाटते किंवा राजवटी आल्यावर काही बदल केले जात तसे वाटते.

yakub baba dargah
Childrens Health : मुलांनी खोटं बोलणं टाळावं यासाठी काय करावं?

याकुबबाबा दर्ग्याला घुमट नाही. त्याची दंतकथा सांगितली जाते की, बाबांना घुमट नको होता त्यामुळे बांधला गेला नाही; परंतु मला वाटते की, कदाचित हे बांधकाम दीर्घकाळ चालले असावे आणि राजवट बदलली की, काही चेंज होतात. त्यात घुमट राहिला असावा, असे वाटते आणि महालक्ष्मी मंदिर आणि हे दर्गा याचे साहित्य, कारागीर रचना यात काहीतरी साधर्म्य नकळत सापडते. अर्थात, इतिहास अभ्यासक यावर जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील; पण आपण इतिहासाचा शोधक विद्यार्थी बनून काही अंदाज करू शकतो. थोडक्यात, हे गाव आणि ही ठिकाणे केळशीमध्ये गेल्यावर आवर्जून पाहण्यासारखी आहेत. अर्थात, केळशी हे गाव कासव पर्यटनासाठी सुद्धा देशात प्रसिद्ध झाले आहे. कधी आलात तर जरूर पाहा.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com