प्रशांत कोरटकर नावाने सावंत यांना आलेल्या फोनवरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्ये करण्यात आली होती.
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (History Researcher Indrajit Sawant) यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरचा (Prashant Koratkar) मोबाईल व सीम कार्ड जुना राजवाडा पोलिसांकडे जमा झाले. नागपूरहून सायबर पोलिसांचे पथक हे साहित्य घेऊन कोल्हापुरात आले आहे. दोन्ही वस्तूंचा पंचनामा करून जुना राजवाडा पोलिसांनी (Juna Rajwada Police Station) त्या ताब्यात घेतल्या असून, गुरुवारी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.