
कोल्हापूर : आजरा येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातानंतर जखमीला घेण्यासाठी रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे जंगली-डोंगरी तालुक्यात दूरच्या अंतरावर तातडीने रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.