जोतिबा डोंगर : जोतिबाच्या नावानं चांगभलं... नंदी... महादेव... चोपडाईदेवी... यमाईदेवी... काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथील दुसऱ्या पाकाळणी रविवारी यात्रा भक्तिमय वातावरणात झाली. या सोहळ्याच्या निमित्ताने डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे (Jyotiba Dongar Chaitra Yatra) स्वरूप प्राप्त झाले. सुमारे दोन लाख भाविकांनी देवाचे दर्शन घेतले.