कोडोली : जोतिबा डोंगरावर (Jyotiba Dongar) झालेल्या खुनाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश आले. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे सिद्ध झाले. आप्पासो शंकर बोरगावे (वय ४५, रा. मोळे, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत गौडप्पा शिंदे, राजू भिमाप्पा हुलागटी (रा. देसाईवाडी, ता. अथणी, जि. बेळगाव) या संशयित आरोपींना कर्नाटकातून ताब्यात घेतले.