Jyotiba Temple Kolhapur : डोळे दिपवणारा सोहळा! कडक उन्हातही जोतिबाचा डोंगर गुलालात न्हाऊन निघाला; नैवेद्यासाठी पुजाऱ्यांच्या घरी भाविकांची गर्दी

Jyotiba Dongar Third Kheti Witnesses Record-Breaking Crowd : जोतिबा डोंगरावर तिसऱ्या खेट्याला विक्रमी गर्दी झाली. भाविकांनी गुलाल उधळत नैवेद्य अर्पण केला. कडक पोलिस बंदोबस्तात भक्तिमय वातावरणात मंदिर परिसर गुलालाने न्हाऊन निघाला.
Jyotiba Dongar Third Kheti 2026

Jyotiba Dongar Third Kheti 2026

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे काल तिसऱ्या खेट्याला प्रचंड गर्दी झाली. रविवार आणि पुढील रविवार नैवेद्यासाठी अनुकूल असल्याने बहुतांश भाविकांनी आजच डोंगरावर येऊन पुजाऱ्यांच्या घरी नैवेद्य करण्यासाठी गर्दी केली. तिसऱ्या खेट्याने यंदाच्या गर्दीचा उच्चांक गाठला. सर्वत्र गुलालाने माखलेले भाविक दिसत होते. मंदिर परिसर गुलालात न्हाऊन निघाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com