Jyotiba Dongar : जोतिबा डोंगरावरील 67 लाखांचा सौरऊर्जा प्रकल्प रेंगाळला; ग्रामस्थांसह भाविकांतून तीव्र नाराजी

प्रकल्पासाठी ६७ लाख ७७ हजार निधीची मंजुरी मिळाली आहे.
Jyotiba Dongar Solar Power Project
Jyotiba Dongar Solar Power Projectesakal
Summary

तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाविकांकडून माणसी एक रुपया जमा करण्याची परवानगी दिली.

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील गायमुख तलावाच्या काठावर होणारा सौरऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) केवळ जागेअभावी रेंगाळलेला आहे. नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ भाविकांतून होत आहे.

Jyotiba Dongar Solar Power Project
Kolhapur Loksabha : कोल्हापूर-हातकणंगले कोणाला? पवारांच्या उपस्थितीत 'MVA'ची खलबते; जागा वाटपासह उमेदवारी निश्‍चितीची शक्यता!

प्रकल्पासाठी ६७ लाख ७७ हजार निधीची मंजुरी मिळाली आहे. जोतिबा (Jyotiba Dongar) ग्रुप ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलापोटी वीज वितरण कंपनी वारंवार वीज पुरवठा खंडीत करते. परिणामी, सर्व ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतीचा आर्थिक परिस्थितीचा मुद्दा ऐरणीवर येतो.

जोतिबा ग्रामपंचायतीचे (Jotiba Gram Panchayat) आर्थिक उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. त्यात वर्षाला चैत्रयात्रा व श्रावण षष्ठी अशा दोन यात्रा होतात. त्यामुळे हा सर्व खर्च करताना ग्रामपंचायतीस मोठी आर्थिक कोंडी होते. ग्रुप ग्रामपंचायत गायमुख येथे सौरऊर्जेचा पॅलॅन्ट करण्यासाठी दोन-तीन वर्षांपासून आग्रही आहे. त्यांनी मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास महामंडळ (महाऊर्जा) यांच्याकडे सौर ऊर्जेच्या प्लॅनचा प्रस्ताव पाठवला.

Jyotiba Dongar Solar Power Project
राज्यातील प्रकल्पांसाठी 'टाटा' गुंतवणार तब्बल 2300 कोटी; सरकारशी करार, 1600 जणांना मिळणार रोजगार

महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी जोतिबा डोंगरावर येऊन सर्वत्र पाहाणी करून प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंजुरी दिली होती. या सौरऊर्जेच्या प्लॅनवर गायमुख तलाव येतील ९० हॉर्सपाऐवरचे दोन विद्युत पंप चालणार असून जागेची पाहाणी सुरु आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाविकांकडून माणसी एक रुपया जमा करण्याची परवानगी दिली. या करातून ग्रामपंचायत नळपाणी योजनेचे वीज बिल भरते.

Jyotiba Dongar Solar Power Project
Loksabha Election: 'सांगली, हातकणंगलेतून प्रतीकसाठी चाचपणी'; जयंत पाटलांचे नव्या मांडणीचे संकेत, शेट्टींच्या मतदारसंघात एन्ट्री?

सहा महिन्यांपासून मात्र कर पाच रुपये केला आहे. ग्रामपंचायत ठेका पध्दतीने कर गोळा करते. जोतिबा ग्रामपंचायतीस केवळ पाणीपट्टी व घरफाळा यातूनच उत्पन्न मिळते. हेच उत्पन्न फक्त वीज बीलापोटी खर्च करावे लागते. महिन्याला दीड ते दोन लाख वीज बिल येते. आता नवीन वर्षात सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यावर मात्र वीज बिलाची बचत होऊन वारंवार वीज पुरवठा तोडला जातो. त्याचा प्रश्न मात्र कायमचा निकाली निघणार आहे.

जोतिबा डोंगरावर गायमुख तलावाच्या काठावर सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी मिळाल्यामुळे तलावातील विद्यूत बंब सौरऊर्जेच्या वीजेवर सुरू होतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचा वीज बिलाचा भार थोडा कमी होणार आहे. उत्पन्न कमी असल्यामुळे कसरत होते. सौरऊर्जा प्रकल्प जागेअभावी रेंगाळत आहे. जिल्हाधिकाऱ्यानी हा प्रश्न मार्गी लावावा.

-राधा बुणे, सरपंच, जोतिबा डोंगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com