सोमवारी मुख्य मंदिरातील गाभाराऱ्यात जोतिबा मूर्तीवर धार्मिक विधी करून गाभारा बंद करण्यात आला होता.
जोतिबा डोंगर : श्रीक्षेत्र वाडी रत्नागीरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्रीक्षेत्र जोतिबा मंदिरात (Jyotiba Temple) जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात व मंगलमय वातावरणात आज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा विधी करण्यात आला. गाभाऱ्यात धार्मिक विधी झाल्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. या सोहळ्यासाठी दत्त देवस्थान मठ श्रीक्षेत्र आडी येथील परमात्सराज महाराज हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत.