esakal | आंबेओहळ प्रकल्पांवरील बंधारे जूनपूर्वी होणार पूर्ण

बोलून बातमी शोधा

The K T Weir Dams On The Ambeohal Project Will Be Completed Soon Kolhapur Marathi News

आंबेओहळ प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येणार आहेत.

आंबेओहळ प्रकल्पांवरील बंधारे जूनपूर्वी होणार पूर्ण
sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तूर : येथील आंबेओहळ प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येणार आहेत. या सर्व बंधाऱ्यांची कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे पाटबंधारे खात्याने नियोजन केले आहे. 

हा प्रकल्प पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लाभदायक ठरणार आहे. प्रकल्पांतर्गत सहा हजार 359 हेक्‍टर पीकक्षेत्र सिंचनाखाली येईल. आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यातील 11 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. धरणसाठ्यामधून सात गावांना सात केटीवेअरमधून पाणी पुरविण्यात येईल.

उत्तूरपासून गिजवणेपर्यंत सात ठिकाणी हे बंधारे बांधले जातील. धरणात पाणी साठल्यावर रोटेशन पद्धतीने पाणी सोडले जाईल व उपसाद्वारे शेतकरी पाणी उचलतील. यापैकी सहा बंधाऱ्यांची बांधकामे तीन निविदांद्वारे केली आहेत. सर्व बंधारे जून 2021 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

या सर्व बंधाऱ्यांची किंमत चार कोटी 75 लाख रुपये होईल. सर्व बंधारे हलक्‍या वाहनास उपयोगी ठरणार आहेत. एक नंबरचा बंधारा पाणंद रस्त्यावर येत असल्याने त्याची रुंदी 4.25 मीटर रुंद धरण्यात आली. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur