Kagal Assembly Constituency MLA Hasan Mushrifesakal
कोल्हापूर
'पुढील विधानसभा निवडणूकसुद्धा मी लढवणार, ती माझी शेवटची निवडणूक असेल'; हसन मुश्रीफांचं मोठं विधान
Kagal Assembly Constituency MLA Hasan Mushrif : ‘कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सहाव्यांदा निवडून दिले. त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत.
Summary
'राजर्षी शाहू महाराजांना बाजूला करणे हे आमच्या मनात देखील नाही. त्यामुळे चुकून राहून गेलेल्या फोटोबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो’, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
कागल : ‘कागल विधानसभा मतदारसंघातील (Kagal Assembly Constituency) जनतेने मला सहाव्यांदा निवडून दिले. त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. आणखी एक विधानसभेची निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूकसुद्धा मी लढविणार आहे. ती माझी शेवटची विधानसभा निवडणूक असेल,’ असे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले. ‘त्या निवडणुकीनंतर त्यापुढची लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढवून खासदार होणे व केंद्रात मंत्री होण्याचे माझे स्वप्न आहे’, असे ते म्हणाले.
