विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय भूमिका कोणती घ्यावी, याविषयी समरजितसिंह घाटगे यांची द्विधा मनस्थिती आहे. त्यातून ते भविष्यात स्वगृही परतण्याची शक्यता होती.
कोल्हापूर : राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल तालुक्यात नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार असून, या मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काल घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांच्यासोबत भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दीर्घ चर्चा केली.