Kagal Border Check Post : कागल सीमा तपासणी नाका बंदोबस्तात सुरू; तणावपूर्ण वातावरण
Kolhapur News : आंदोलनात नाक्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनीही पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला होता. या तपासणी नाक्याचे काम तीन शिफ्टमध्ये चालवले जाणार आहे.
कागल : प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड या शासननियुक्त सेवापुरवठादाराकडून आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका मंगळवारी पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आला.