Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Highway Crash : कागल तालुक्यातील सोनगे येथील ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सीमा तपासणी नाक्याजवळ झालेल्या मोटार-दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामदास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कागल : मोटार-दुचाकी अपघातात सोनगे (ता. कागल) येथील हा तरुण रामदास पाटील जखमी झाला होता. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल सीमा तपासणी नाक्याजवळ सोमवारी दुपारी साडेचार वाजता हा अपघात झाला.