Kagal Politics : मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, त्यांच्याविरुद्ध लढाई अटळ; समरजीत घाटगेंचं ओपन चॅलेंज

भाजपच्या मेहरबानी आणि कृपेमुळे मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
Samarjeet Ghatge vs Hasan Mushrif
Samarjeet Ghatge vs Hasan Mushrifesakal
Summary

'येत्या काळात मोठा विजय मिळवायचा आहे. शेवटी एवढेच म्हणतो, ‘जितना संघर्ष बडा होगा, जीत उतनीही शानदार होगी’.

कोल्हापूर : एकेकाळी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका करायचे, जातीयवादी पक्ष म्हणून भाजपवर आरोप करायचे, त्याच भाजपच्या मेहरबानी आणि कृपेमुळे मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत, अशी टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsingh Ghatge) यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

दरम्यान, श्री. मुश्रीफ (Hasan Mushrif) हे मुख्यमंत्री जरी झाले तरी त्यांच्यासमोर मीच असणार आहे. त्यांची व माझी कागलमधील लढाई अटळ आहे, असेही घाटगे म्हणाले. मुश्रीफ यांची काल (ता. ४) जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांनी घाटगे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Samarjeet Ghatge vs Hasan Mushrif
Loksabha Election : 'तिसऱ्यांदा मोदीच पुन्हा पंतप्रधान, साताऱ्याचा खासदारही भाजपचाच होणार'; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छाही, असे सांगून घाटगे म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी भाजपने घालून दिलेल्या चौकटीतच काम करावे. यापूर्वीसारखा मनमानीचा कारभार चालणार नाही. पक्षाने घालून दिलेली चौकट पार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्यासमोर उभा राहून त्यांना चौकटीतच ठेवायचे काम मी करेन.’

Samarjeet Ghatge vs Hasan Mushrif
Kolhapur : मुश्रीफ पालकमंत्री होताच भाजप कार्यकर्त्यांची अवस्था 'इकडे आड अन् तिकडे विहीर'; चंद्रकांतदादांचा अपेक्षाभंग?

घाटगे म्हणाले, ‘त्यांचा, माझा संघर्ष अटळ आहे. ते मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. कागलचे सुराज्य होणे अटळ आहे. माझ्याकडे कुठलेही राजकीय पद किंवा राजकीय सत्ता नाही. त्याचाही मला काही फरक पडत नाही. माझ्या गुरूंचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठे राजकीय पद आणि सत्ता आहे. यापुढे मी आणखी जोमाने काम करणार आहे. त्याच जोमाने कार्यकर्त्यांना लोकांच्या सेवेत राहण्याचे आवाहन करणार आहे.

येत्या काळात मोठा विजय मिळवायचा आहे. शेवटी एवढेच म्हणतो, ‘जितना संघर्ष बडा होगा, जीत उतनीही शानदार होगी’.’ त्यांच्या सगळ्याच प्रश्‍नांची उत्तरे मी देणार नाही. बदल हवा तर आमदार नवा हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मी व माझे कार्यकर्ते काम करत राहू, असेही घाटगे म्हणाले.

Samarjeet Ghatge vs Hasan Mushrif
मोठी बातमी! महाराष्ट्राचा विरोध झुगारून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न; ड्रोनद्वारे होणार सर्व्हे

‘त्यांनी’ गुरूच बदलला

काहींनी सत्ता आणि पदासाठी गुरूच बदलले, हा त्यांच्या व माझ्यातील फरक. गुरूंच्या आशीर्वादाची ताकद कागल मतदारसंघात मी दाखवून देणार आहे, असा इशाराही घाटगे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com