मोठी बातमी! महाराष्ट्राचा विरोध झुगारून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न; ड्रोनद्वारे होणार सर्व्हे

आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Almatti Dam Karnataka Government
Almatti Dam Karnataka Governmentesakal
Summary

आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्राचा विरोध आहे. पण विरोध असूनही कर्नाटकाने उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव : आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आलमट्टी धरणाची उंची ५१९.६०० मीटरवरून ५२४.२५६ मीटर इतकी वाढविली जाणार आहे. मात्र, त्यानंतर बेळगाव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलमट्टी धरणाच्या पाण्याचा फुगवटा (बॅक वॉटर) वाढणार आहे.

Almatti Dam Karnataka Government
Kolhapur : मुश्रीफ पालकमंत्री होताच भाजप कार्यकर्त्यांची अवस्था 'इकडे आड अन् तिकडे विहीर'; चंद्रकांतदादांचा अपेक्षाभंग?

त्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) नव्याने भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. भू-संपादनासाठी ड्रोन सर्वेक्षण कामाचा ठेका देण्यासाठी जलसंपदा विभागाचा भाग असलेल्या कृष्णा भाग्य जल निगमकडून निविदा मागविण्यात आली आहे.

Almatti Dam Karnataka Government
Chiplun : 'मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही'; सामंतांच्या भेटीनंतर कदमांचं स्पष्टीकरण

ड्रोन सर्वेक्षण कामाचा अनुभव असलेल्या कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. ऑक्टोबरमध्येच ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. धरणाची उंची वाढविण्याच्या अनुषंगाने आलमट्टी येथे काही कामेही सुरू केली आहे. त्यासाठी सहा महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून निविदा काढली होती. उंची वाढविल्यानंतर फुगवट्याचे क्षेत्रही वाढणार असल्याने नव्याने भूसंपादन केले जाणार आहे.

सर्वेक्षणात कोणत्या जमिनीचे संपादन करावे, हे निश्‍चित केले जाणार आहे. त्यानंतर रीतसर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सध्या या धरणाची उंची ५१९ मीटर इतकी आहे. पाणी साठविण्याची क्षमता १२३ टीएमसी आहे. धरणाची उंची ५२४.२५६ मीटर झाल्यास जलाशयातील पाणीसाठा २०० टीएमसी इतका होणार आहे. त्यासाठीच उंची वाढविण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत.

Almatti Dam Karnataka Government
'पाय काढायला निघालेत, जनता चिडली तर तुमच्या कमरेला लंगोटही राहणार नाही'; रणजितसिंहांची रामराजेंवर सडकून टीका

आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्राचा विरोध आहे. पण विरोध असूनही कर्नाटकाने उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी यासंदर्भात कोल्हापूर येथे दोन्ही राज्याच्या राज्यपालांची बैठकही झाली होती. त्यावेळी आलमट्टी धरणाबाबत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवण्याबाबतचा निर्णय झाला होता. पण उंची न वाढविण्याबाबतची हमी कर्नाटक सरकारकडून एकदाही दिली गेलेली नाही.

मागील सरकारच्या काळात पाटबंधारे मंत्री असलेल्या गोविंद कारजोळ यांनी धरणाची उंची वाढविण्याबाबतचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. २००५ व २०१९ साली कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा संबंध महाराष्ट्राने आलमट्टी धरणासोबत जोडला. त्यानंतर महाराष्ट्राने धरणाची उंची वाढविण्यास सातत्याने विरोध केला. धरणाची उंची वाढविली तर सांगली व कोल्हापूर या दोन जिल्‍ह्यांना धोका असल्याचे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. पण उंची वाढविल्यामुळे महापूर येणार नाही, अशी कर्नाटकाची भूमिका आहे.

Almatti Dam Karnataka Government
Uday Samant : 'मी वाघनखांच्या जवळ होतो, तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून अंगावर..; सामंतांनी सांगितला थरारक अनुभव

विरोध होण्याची शक्यता

धरणाची उंची वाढविण्यात केंद्रीय जल आयोगानेही कर्नाटकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्नाटक जलसंपदा विभागाकडून टप्‍प्या-टप्प्याने उंची वाढविण्याशी संबंधित कामे हाती घेतली जात आहेत. जलाशयाची उंची वाढविली तर फुगवटा वाढणार हे नक्की आहे. त्यासाठीच्या भूसंपादनाला विरोध होण्याची शक्यता आहे; पण सध्या जलसंपदा विभागाने भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे.

आकडे बोलतात

  • ५१९.६०० मीटर - सध्याची उंची

  • ५२४.२५६ मीटर - उंची वाढणार

  • १२३ टीएमसी - सध्याचा पाणीसाठा

  • २०० टीएमसी - पाणीसाठा वाढणार

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com