कोल्हापूर : महायुतीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोबत घेतल्याने होत असलेले आरोप यामुळे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपकडून (BJP) सुरू आहे. त्यातून काही जिल्ह्यांत भाजपमध्ये अन्य पक्षांतून ‘इनकमिंग’ सुरू आहे.