Kagal Ram Mandir : कागलमधील श्रीराम मंदिर बांधण्यात माझं मोठं योगदान; असं का म्हणाले हसन मुश्रीफ?

गेल्या अनेक वर्षांपासूनची देशवासीयांची भावना असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर (Ayodhya Ram Mandir) साकारले आहे.
Kagal Ram Mandir Darshan Hasan Mushrif
Kagal Ram Mandir Darshan Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

देशातील सर्वधर्मियांची धार्मिकस्थळे चांगली करण्याचा प्रयत्न केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कागल येथील श्रीराम मंदिर बांधण्यामध्ये माझे मोठे योगदान आहे.

कागल : ‘गेल्या अनेक वर्षांपासूनची देशवासीयांची भावना असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर (Ayodhya Ram Mandir) साकारले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत आहे. याच दिवशी येथील गैबी चौकात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

Kagal Ram Mandir Darshan Hasan Mushrif
Ram Rangoli Record: सांगलीच्या आदमअलीने साकारली प्रभू श्रीरामाची रांगोळी; तब्बल 200 टन गुजराती रांगोळीचा वापर, होणार 'विश्वविक्रम'

मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शन घडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अयोध्या येथील श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होत आहे. या आनंदोत्सवानिमित्त मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने एक लाख कुटुंबांमध्ये आनंदोत्सवाचा प्रसाद वाटप प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील श्री राम मंदिरात (Ram Mandir Kagal) झाला. यावेळी ते बोलत होते.

Kagal Ram Mandir Darshan Hasan Mushrif
20 हजार चौरस फूट जागेवर मिरजेत साकारतेय राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती; 1 कळस, 22 शिखरे, 150 कमानी, 167 खांबांची निर्मिती

मुश्रीफ म्हणाले, ‘देशातील सर्वधर्मियांची धार्मिकस्थळे चांगली करण्याचा प्रयत्न केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कागल येथील श्रीराम मंदिर बांधण्यामध्ये माझे मोठे योगदान आहे. २२ जानेवारी रोजी देशातील १४० कोटी जनता हा सोहळा साजरा करणार आहे. याच दिवशी कागलमध्ये गैबी चौकात भव्यदिव्य कार्यक्रम घेणार आहोत. टाळ मृदंगाच्या गजरात व भव्य आतिषबाजीने हा सोहळा साजरा करणार आहोत. ’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

CM Devendra Fadnavis Kagal visit
ayodhya ram mandir julan utsav
Hasan Mushrif Gokul Milk Union election announcement
Swami Govind Dev Giri
Marathi News Esakal
www.esakal.com