

Goat-Laden Truck Overturns at Dangerous Curve Near Vhannur
Sakal
कागल : कागल–निढोरी राज्य मार्गावरील व्हन्नूर (ता. कागल) येथील खोत मळ्याशेजारील धोकादायक वळणावर आज पहाटे बकरीवाहू ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २०० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. राजस्थानमधून कर्नाटक राज्याच्या दिशेने बकऱ्यांची वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा हा ट्रक पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास पलटी झाला. ट्रकमध्ये तीन वेगवेगळ्या कप्यात तब्बल २२० बकऱ्यांना दाटीवाटीने भरले होते. धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत उलटला आणि बकऱ्यांचा मोठा खच पडला.