कागल : राजकीय टोलेबाजी व्यासपीठ फोटो

कागल : राजकीय टोलेबाजी व्यासपीठ फोटो

06792
कागल : श्रीनाथ सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र आलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे.
....

वाढदिवसाच्या कार्यक्रमात रंगली राजकीय टोलेबाजी

संजय घाटगे निवडणूक लढवणार नाही तर संजय घाटगे आणि मुश्रीफ यांच्याकडून विक्रमसिंह घाटगे यांचे गुणगाण

कागल, ता. ९ : येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात तालुक्यातील नेत्यांनी राजकीय टोलेबाजी रंगली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे यांनी केलेल्या जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत आली. श्रीनाथ सहकार समूहाचे संचालक संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमात ही राजकीय टोलेबाजी झाली. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच या कार्यक्रमात कागल तालुक्यातील चारही गटाचे नेते एकत्र आले होते. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात वीरेंद्र मंडलिक यांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पडलेल्या मतांबाबत विषय काढला. ते म्हणाले, ‘चंद्रकांत गवळी यांचे सुपुत्र दिवंगत उमेश गवळी आज असते तर कागलमध्ये प्रा. मंडलिक यांना दहा हजारांचे लीड मिळाले असते.’
त्यानंतर आपल्या भाषणात संजय घाटगे म्हणाले, ‘मला माझ्या निवडणुकीत कागल शहरातून चार ते पाच हजार मते मिळाली. पण, लोकसभेच्या निवडणुकीत शाहू महाराजांना चांगली मते कागलवासीयांनी दिली. त्याबद्दल कागलवासीयांचे मी आभार मानतो. माझ्या जीवनात विक्रमसिंहराजेंना वगळले तर आमचे जीवन शून्य आहे. आम्हाला प्रसारमाध्यमे लांब ठेवतात. टीव्ही लावला की एका बाजूला मुश्रीफ खुलासा देताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला दुसरा एक नेता आपले म्हणणे मांडताना दिसतो. शाहू कारखान्याच्या निवडणुकीत मुश्रीफ राजेंना ''फॉर'' असायचे. पण सदाशिवराव मंडलिक ऐकायच्या मनस्थितीत नसायचे. ते निवडणूक लढवायच्या भूमिकेत असायचे. अशावेळी चंद्रकांत गवळी यांना मध्यस्थीसाठी आम्ही पाठवायचो.’
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत जनतेच्या मनात जे होते ते जनतेने केले. शाहू कारखान्याच्या उभारणीवेळी मी, विक्रमसिंहराजे व संजय घाटगे एकत्र होतो. मध्यंतरी काही कारणाने मतभेद झाले. जोपर्यंत राजे आहेत तोपर्यंत निवडणूक बिनविरोध करायचे मी ठरविले होते. पण, मंडलिक ऐकायचे नाहीत. पण, माझे शाहू कारखाना बिनविरोध करण्यासाठी माझे प्रयत्न असायचे.’
तिन्ही गटांच्या नेत्यांची ही राजकीय टोलेबाजी सुरू असताना समरजितसिंह घाटगे मात्र शांत बसून ऐकत होते. त्यांनी सुरुवातीलाच केलेल्या भाषणात चंद्रकांत गवळी व त्यांच्या संस्थांविषयी गौरवोद्गार काढले.
...

निवडणुकीला उभे राहणार नाही...

संजय घाटगे पुन्हा माईककडे येऊन म्हणाले, ‘स्वतंत्र सभेला मला एवढी माणसे जमली नसती म्हणून आभार मानले. मी आभार मानतोय म्हणजे यापुढे मी निवडणुकीला उभे राहणार नाही. त्यात आता अपेक्षा कुठल्याही राहिल्या नाहीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com