esakal | कळंबा पाणी पातळी पंधरा फुटांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Kalamba water level at fifteen feet

बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावातील पाणी पातळी पंधरा फुटांवर पोचली आहे. त्यामुळे तलावांमधून महापालिका व ग्रामपंचायतीने चार एमएलडी पाणी उपसा कमी केला आहे. तसेच पूर्व-पश्‍चिम दक्षिण बाजूचे पात्र कोरडे पडल्यामुळे शाळकरी मुले क्रिकेट आणि फुटबॉल खेळत असल्याचे चित्र आहे. 

कळंबा पाणी पातळी पंधरा फुटांवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कळंबा : बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावातील पाणी पातळी पंधरा फुटांवर पोचली आहे. त्यामुळे तलावांमधून महापालिका व ग्रामपंचायतीने चार एमएलडी पाणी उपसा कमी केला आहे. तसेच पूर्व-पश्‍चिम दक्षिण बाजूचे पात्र कोरडे पडल्यामुळे शाळकरी मुले क्रिकेट आणि फुटबॉल खेळत असल्याचे चित्र आहे. 

पाच रुपये दराने प्रति दहा हजार लिटर्सप्रमाणे होणारी रक्कम महापालिकेकडे भरणा करावी व कळंब्याला पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर योजनेतून पाणी पुरवठा करणे शक्‍य होणार नाही, असे पत्र ग्रामपंचायतीला महापालिकेने पाठवले आहे, तर तलाव बांधणीसाठी ग्रामस्थांनी विनामोबदला जमिनी दिल्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी अजीवन तलावातून गावाला पाणीपुरवठा करावा, असा ताम्रपट प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे गावासाठी तलाव राखीव ठेवावा, असे निवेदन ग्रामपंचायतीकडून महापालिकेला देण्यात येणार असल्याचे सरपंच सागर भोगम यांनी सांगितले. 

कळंबा, पाचगाव आणि निम्म्या शहराची जीवनदायिनी म्हणून कळंबा तलावाकडे पाहिले जाते. दररोज आठ एमएलडी पाणी उपसा करून येथील नागरिकांना पुरवठा केला जातो. मात्र, पावसाळ्यानंतर सहा महिन्यात तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे पाणीपातळीत सतरा फुटाने घट झाली आहे. तलावाचे जलचक्र अबाधित ठेवण्यासाठी दहा फूट पाणीसाठा तलावात शिल्लक ठेवावा लागणार आहे. त्यामुळे कळंबा व शहरासाठी तलावांमधून सध्या स्थितीला पाच फूटच पाणी उपसा करावा लागणार आहे. 

loading image
go to top